Loksabha 2019 : देशात 60.44 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

बिहार आणि ओडिशातील मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) शांततेत पार पडले. नऊ राज्यांतील 72 मतदारसंघात 60.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही.

नवी दिल्ली : बिहार आणि ओडिशातील मतदान यंत्रांतील बिघाडाच्या किरकोळ घटना वगळता देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (सोमवार) शांततेत पार पडले. नऊ राज्यांतील 72 मतदारसंघात 60.44 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही.

सहा वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान

 • बिहार 57.71 टक्के
 • जम्मू-काश्‍मीर 9.79 टक्के
 • मध्य प्रदेश 66.14 टक्के
 • महाराष्ट्र 52.80 टक्के
 • ओडिशा 64.05 टक्के
 • राजस्थान 64.50 टक्के
 • उत्तर प्रदेश 54.16 टक्के
 • पश्‍चिम बंगाल 76.59 टक्के
 • झारखंड 63.77 टक्के

चार वाजेपर्यंत 49.56 टक्के मतदान

 • बिहार 44.23 टक्के
 • जम्मू-काश्मीर 8.42 टक्के
 • मध्य प्रदेश 55.31 टक्के
 • महाराष्ट्र 41.21 टक्के
 • ओडिशा 51.54 टक्के
 • राजस्थान 54.21 टक्के
 • उत्तर प्रदेश 44.16 टक्के
 • पश्चिम बंगाल 66.01 टक्के
 • झारखंड 56.37 टक्के

दुपारी दोनपर्यंत सुमारे 38.86 टक्के मतदान

 • बिहार 37.71 टक्के
 • जम्मू-काश्मीर 6.66 टक्के
 • मध्य प्रदेश 44.07 टक्के
 • महाराष्ट्र 30.94 टक्के
 • ओडिशा 35.79 टक्के
 • राजस्थान 44.58 टक्के
 • उत्तर प्रदेश 34.14 टक्के
 • पश्चिम बंगाल 52.37 टक्के
 • झारखंड 44.90 टक्के

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 8, मध्य प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी सहा, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन आणि जम्मू काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात मतदान होत आहे. 

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत 3.45 लाख मतदारांपैकी केवळ 1 टक्का मतदार मतदानासाठी पुढे आले. दुपारी एकपर्यंत येथे 6.47 टक्के मतदान झाले. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासमवेत 18 उमेदवार एका जागेसाठी निवडणूक रिंगणात आहेत. 

उत्तर प्रदेशात एकपर्यंत 23.50 टक्के उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहाजानपूर, खेरी, हरदौई, मिस्रिख, उनाऊ, फारुखाबाद, इटवाह, कनौज, कानपूर, अकबरपूर, झांशी आणि हमीरपूर या मतदारसंघात मतदान सुरू आहे. डिम्पल यादव, सलमान खुर्शिद, साईप्रकाश जैयस्वाल, साक्षी महाराज, अन्नू टंडन आदी प्रमुख उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदार ठरवत आहेत. 

राजस्थानमध्ये 30.10 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. टोंक, अजमेर, पाली, जोधपूर, बारमेर, जलौर, उदयपूर, बंसवारा, चित्तोडगड, राजसमंड, भिलवाडा, कोटा आणि झालवार-बारण मतदारसंघात मतदान सुरू आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघात सकाळी मतदान केले. त्यांचे पूत्र नकूल नाथ या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुख्यमंत्री कमल नाथ मतदानासाठी मतदार केंद्रावर गेले, त्याचवेळी काही मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र, तातडीने पुरवठा सुरळीत केला गेला, असे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले. सिद्धी, शाहदोल, जबलपूर, मंडला, बालाघाट आणि छिंदवाडामध्ये मतदान सुरू आहे. 

झारखंडमध्ये एकपर्यंत 29.98 टक्के मतदानाची नोंद झाली. ओडिशामध्ये सुमारे 95 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

बिहारमध्ये सुमारे 18.26 टक्के मतदारांनी मतदान केले. दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराई आणि मुंगेर मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदान यंत्रातील बिघाडाच्या तक्रारी दरभंगा आणि बेगुसराईमध्ये झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lok Sabha elections 2019 phase 4 live updates