Election Results : मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले.

नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले.

भाजपप्रणित लोकसभा निवडणुकीत 350 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळविला. या विजयानंतर भाजप मुख्यालयात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना मोदींची स्तुती केली.

शहा म्हणाले, की आजचा विजय हा मोदींच्या लोकप्रियतेचा आहे. भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मोदींनी देशभर तुफानी दौरा केली. त्यामुळे भाजपला हे यश मिळू शकले. या विजयाचे पूर्ण श्रेय मोदींना जाते. काम करणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा पूर्ण बहुमत मिळाले आहे. 50 टक्के मते मिळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मी सांगितले होते. त्यानुसार काम करत आज 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. मोदींची लोकप्रियता आणि भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम यांचा फायदा भाजपला झाला आहे. उत्तर प्रदेशात आम्ही सप आणि बसपला आघाडीला मात देऊन विजय मिळविला. देशात आता परिवार आणि जातीवाद कऱणाऱ्या पक्षाला स्थान नाही. ईव्हीएमबद्दल विरोधकांनी आकडतांडव केला. तिच मेहनत विरोधकांनी मते मिळविण्यासाठी केला पाहिजे होता. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, ओडिशात नवीन पटनाईक यांना विजय मिळविल्याने त्यांचे अभिनंदन करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi is the main hero of this victory says Amit Shah