Loksabha 2019 : 'काँग्रेससह सप-बसप सरकारमध्ये मुस्लिम महिलांचे शोषण'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 • बीएसपी सरकार जात-पात, समुदायाच्या नावे अत्याचार करते. 
 • काँग्रेस नेहमी मागासलेल्यांच्या विरोधात राहीली आहे.
 • काँग्रेस, सपा आणि बसपा यांच्या सरकारमध्ये मुस्लिम महिलांचे शोषण कायमच होत राहील. 

लोकसभा 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली होती. 'ही निवडणूक भारताचे भविष्य ठरवेल,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्यासोबतच त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या सभांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी व भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. काय बोलले पंतप्रधान मोदी पाहुया...

 • इमानदार आज आश्वस्त आहेत, भ्रष्टाचारी त्रस्त आहेत. 
 • विरोधकांकडे एकच निती आहे ती म्हणजे 'चौकीदार हटवा' 
 • जात-पात, समुदाय यांच्या आधारावर कसा अत्याचार झाला, मुलींसोबत काय-काय अन्याय झाला, किती अत्याचार झाला, ते सर्व आठवा.
 • उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून मोदींचा विरोधकांवर हल्ला. 'काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. 
 • काँग्रेसच्या हलगर्जीपणामुळे दहशतवाद्यांना चालना मिळाली. आम्ही केलेल्या दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर काही लोकांना रडू कोसळले. 
 • एक भारत, श्रेष्ठ भारत बनविणे हाच आमच्या सरकारचा संकल्प. 
 • काँग्रेस टुकडे-टुकडे गँगचा सन्मान करते. 
 • बीएसपी सरकार जात-पात, समुदायाच्या नावे अत्याचार करते. 
 • काँग्रेस नेहमी मागासलेल्यांच्या विरोधात राहीली आहे.
 • काँग्रेस, सपा आणि बसपा यांच्या सरकारमध्ये मुस्लिम महिलांचे शोषण कायमच होत राहील. 
 • काँग्रेसने त्यांच्या खोट्या पत्रात (जाहिरनामा) जे लिहीले आहे, त्यानुसार अर्थ होतो की मुलींसोबत राक्षसी अत्याचार करणाऱ्यांना आता जेल नाही जामीन मिळेल. असा विचार करणाऱ्याला युपीचे लोक माफ करतील का?
 • काँग्रेस तिहेरी तलाक विरोधात असलेल्या कायद्याला कधी परवानगी देणार नाही. आम्ही जो अध्यादेश आणू, तो कधीही पारित केला जाणार नाही याची मात्र ते काळजी घेतील.

याशिवाय मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही आठवण केली. 'राजीव गांधी यांनी संसदेत मंडल कमीशनचा विरोध केला होता. काँग्रेसला ओबीसी कमीशनवरही आक्षेप आहे,' असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस ही महामिलावटी आहे अशी टिका करत मोदींनी देशाच्या युवांचे स्वप्न आणि आकांक्षा यांच्या पुर्ततेचे आश्वासन दिले. भारतीय सेनेचे मनोबल वाढेल असेच आमचे प्रयत्न राहील असे म्हणत मोदी यांनी हिंसे ऐवजी देशात शांती राहील यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime minister narendra modi addressed to public meeting in uttar pradesh