Loksabha 2019 : राहुल गांधी चांगले नेते; संख्याबळावर ठरेल पंतप्रधान- नायडू

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

नायडू म्हणाले, "सध्या देशात प्रस्थापितविरोधी लाट असून मोदींनी चांगले प्रयत्न केले पण त्यांना फार काही मिळवता आले नाही, यामुळेच त्यांनी पुलवामा आणि बालाकोटची चर्चा सुरू केली.

हल्दिया (पश्‍चिम बंगाल) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एक चांगले नेते असून, ते नेहमीच देशाचा विचार करतात. केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भाजपेतर पक्षांनी 1996 मध्ये आघाडीच्या सरकारमधून कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची जी चूक केली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे प्रतिपादन तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.

भाजपेतर पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार देखील त्या त्या पक्षांच्या खासदारांची संख्या पाहूनच ठरविला जाईल असेही त्यांनी नमूद केले. नायडू म्हणाले, "सध्या देशात प्रस्थापितविरोधी लाट असून मोदींनी चांगले प्रयत्न केले पण त्यांना फार काही मिळवता आले नाही, यामुळेच त्यांनी पुलवामा आणि बालाकोटची चर्चा सुरू केली.

प्रत्येक सभेमध्ये ते विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करत त्यांचा अवमान करतात. मोदींच्या प्रचाराकडे तुम्ही पाहिले तर ते दिवसेंदिवस कमकुवत होत गेल्याचे दिसून येतात. भाजपविरोधात कोणीही आवाज उठवू नये म्हणून ते सर्वच राजकीय नेत्यांना धमकावतात.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul good leader will reach consensus on PM candidate after tallying results