Loksabha 2019 : '...तर मोदींसमोरच आत्महत्या करेल'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू होऊ देणार नाही.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन, असे या भाजपचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी म्हटले आहे.

मेघालयातील शिलाँग मतदार संघातून शुलाई हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू होऊ देणार नाही. यासाठी मला जीव द्यावा लागला तरी चालेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक अमलात आणू देणार नाही.'

मेघालयात लोकसभेच्या शिलाँग आणि तुरा या दोन जागा आहेत. या दोन्ही जागा येथील स्थानिक आदिवासी समुदायांसाठी आरक्षित आहेत. गुरुवारी (ता. 11) लोकसभेच्या दोन्ही जांगासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले तर बांगलादेशातून आलेल्या निर्वासित हिंदूंची संख्या वाढेल आणि स्थानिकांची कमी होईल अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत आहे.

Web Title: Sanbor Shullai threatens to commit suicide if the cab bill gets implemented