Loksabha 2019 : तेजबहादूर यादव उमेदवारीप्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस

वृत्तसंस्था
Wednesday, 8 May 2019

तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी 1 मे रोजी फेटाळला होता. याविरोधात तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली.

तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी 1 मे रोजी फेटाळला होता. याविरोधात तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून, या प्रकरणी गुरुवारपर्यंत उत्तर द्यावे, असे म्हटले म्हटले आहे.

दरम्यान, तेजबहादूर यादव यांनी लष्करात दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत तक्रार करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे त्यांना 2017 मध्ये लष्करातून निलंबित करण्यात आले. यादव यांनी समाजवादी पक्षाकडून अर्ज भरला होता. मात्र, लष्कराकडून "ना हरकत पत्र' आणण्याच्या मुद्द्यावरून तो रद्द करण्यात आला होता. आपल्याविरोधात भाजपने कटकारस्थान केले असल्याचा यादव यांचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tej bahadur yadav nomination papers case supreme court notice to ec tells to come prepared