Loksabha 2019 : मला मत द्या, अन्यथा मी शाप देईन: साक्षी महाराज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

उन्नाव मध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये साक्षी महाराज पुन्हा एकदा खासदार होऊ इच्छित आहेत. त्यांनी दारोदार हिंडून मतं मागण्यास सुरूवात केली आहे.

नवी दिल्लीः मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. साक्षी महाराज हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत.

उन्नाव मध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये साक्षी महाराज पुन्हा एकदा खासदार होऊ इच्छित आहेत. त्यांनी दारोदार हिंडून मतं मागण्यास सुरूवात केली आहे. ते म्हणाले, 'मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिले तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन. मात्र, तूर्तास मी तुमच्याकडे मतं मागतो आहे. तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरत आहे. निवडणूकीमध्ये मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन. तुमच्या आयुष्यात असलेला आनंद मी हिरावून घेईन.'

दरम्यान, साक्षी महाराज यांच्या वक्तव्यावर अद्याप भाजपने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. साक्षी महाराज यांच्या वक्तव्याचा आधार घेत विरोधकांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vote for me or i will curse you warns bjp sakshi maharaj