Loksabha Result : पराभवाचा दणका; राहुल गांधी राजीनामा देणार?  

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे तर, राहूल यांच्याकडून अमेठीतील आणि देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारीणीत लवकरच ही यावर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

लोकसभा निकाल 2019 :

राहुल गांधी यांनी दीड वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत त्यांनी मोठा विजय मिळावल्यानंतर उत्साहाचे पक्षात त्यांच्याविषयी उत्साहाचे वातावरण तयार झाले होते, परंतु आजचा पराभव त्यांच्याही चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसत असून त्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Rahul Gandhi resign after humiliating loss in Loksabha 2019