Election Results : मोदी भारत जिंकायला लागले.. जगभरातून कौतुक सुरू झाले!

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे.

नवी दिल्ली : जगभरातील अनेक नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाच्या लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने आतापर्यंत देशभरात झालेल्या मतमोजणीमध्ये स्वबळावर 300हून अधिक जागांवर विजय निश्चित केला आहे. त्यामुळेच इतर देशांच्या अध्यक्षांनी त्यांना या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पत्राद्वारे मोदींना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

इस्त्राईलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोदींचा माझा मित्र असा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच या विजयामुळे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील मोंदीचे नेतृत्व पुन्हा सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. 

या व्यतिरिक्त जपान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतानचे राजे, नेपाळचे पंतप्रधान, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World leaders congratulates Narendra Modi on Loksabha 2019 victory