Election Results : औरंगाबादेत खैरेंना दणका; जलील यांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. जलील यांना या निवडणुकीत निसटता विजय मिळाला आहे.

औरंगाबाद : पहिल्यापासून चुरशीच्या ठरलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अखेर वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. जलील यांना या निवडणुकीत निसटता विजय मिळाला आहे.

अधिकृत आकडेवारी जाहीर झाली तेव्हा इम्तियाज जलील यांना जलील 387412 शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 381600 तर हर्षवर्धन जाधव यांना 281469 मते मिळाली होती. यावेळी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली तर माझेच बॅडलक असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी मतमोजणी केंद्र सोडले व ते तेथून निघून गेले.

दरम्यान सुरवातीपासूनच औरंगाबादेत खान, बाण अन् ट्रॅक्टरचा फॅक्टरची चर्चा राहिली हाताला मात्र आधार औरंगाबादमध्ये कसलाचा आधार मिळाला नाही. 
औरंगाबादमध्ये चार उमेदवार मैदानात असल्यामुळे मतदानाची ही टक्केवारी वाढून 65 टक्क्यांवर गेली होती याचा फायदा अखेर कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. त्याचा आज निकाल लागला आणि जलील हे निवडून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIMIMs Imtiyaz Jaleel wins Aurangabad Loksabha Election 2019