Loksabha 2019: महायुती महाराष्ट्रात 45 जागा जिंकेल- रावसाहेब दानवे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 मे 2019

महाराष्ट्रात 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून 42 जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीत भाजपयुतीला 2014 पेक्षा मोठे यश मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे पुढे म्हणाले की, भाजप आणि मित्रपक्षाच्या जागा वाढून 45 पर्यंत जातील पण त्या 42 ऐवजी 41ही होणार नाहीत. विरोधी पक्ष हे मान्य करत नाहीत पण त्यांना हे मान्य करावे लागणार असल्याचेही दानवेंनी सांगितले आहे.

मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे.

महाराष्ट्रात 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून 42 जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीत भाजपयुतीला 2014 पेक्षा मोठे यश मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे पुढे म्हणाले की, भाजप आणि मित्रपक्षाच्या जागा वाढून 45 पर्यंत जातील पण त्या 42 ऐवजी 41ही होणार नाहीत. विरोधी पक्ष हे मान्य करत नाहीत पण त्यांना हे मान्य करावे लागणार असल्याचेही दानवेंनी सांगितले आहे.

शिवसेनेला एक्झिट पोलच्या अंदाजात फटका बसताना दिसत असला तरी असे होणार नाही. भाजप-सेना युती महाराष्ट्रात 45 जागा जिंकणार असल्यावर शिवसेनेला फटका बसण्याचे काही कारण नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Sena Allaince will win 45 seats in Maharashtra says Raosaheb Danwe