Loksabha 2019 : ‘ईव्हीएम’च्या स्ट्राँगरूममध्ये  उमेदवारांना प्रवेश देऊ नये’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

मुंबई -  ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी नियोजन व अंमलबजावणीबद्दल निवडणूक आयोगाचे पाटील यांनी अभिनंदनही केले आहे. आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले, असे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. लोकसभा निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्राँगरुमध्ये थेट प्रवेशासंबंधी दिलेल्या परवानगीच्या निर्णयास आमचा आक्षेप असून, याचा निषेध करत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

यावर तातडीने पुनर्विचार करून उमेदवारांना या स्ट्राँगरुमध्ये जाण्याची परवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार तांत्रिक करामतीचा अवलंब करून या ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या निकालामध्ये बदल करू शकतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमध्ये रिमोट पद्धतीने अनेक बदल घडविता येतात. हे प्रगत तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे याबाबत आपण विषाची परीक्षा घेऊ नये, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not give admission to candidates in Strongroom of EVMs