Loksabha 2019: निवडणूक ओळखपत्र नाही? तरीही तुम्ही करू शकता मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

- निवडणूक ओळखपत्र नसेल तरी तुम्ही मतदान करू शकता

पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून 23 तारखेला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक निवडणूक ओळखपत्र दिलेले असते. पण तुमच्याकडे ते ओळखपत्र नसेल किंवा हरवले असले तरी तुम्ही अन्य ओळखपत्रांच्या सहाय्याने मतदान करू शकता.

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर खालील ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

1) पारपत्र (पासपोर्ट)
2) वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
3) केंद्र किंवा राज्य सरकारकडून जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र
4) पब्लिक सेक्टर कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र
5) पॅन कार्ड
6) आधार कार्ड
7) बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक 
8) छायचित्र असलेली पेंशनचे ओळखपत्र
9) मनरेगा जॉब कार्ड
10) कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ विम्याच्या उद्देशाने जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी (फोटो वोटर स्लिप)
11) आमदार किंवा खासदार यांच्या कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont have a Voters ID card You can still vote if you have these documents