Loksabha 2019 : भाजपचे घटकपक्ष प्रचारात उदासीन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली होती. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा या दोन मतदारसंघांत उमेदवारी दिली होती. मात्र यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नाही.

मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली होती. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा या दोन मतदारसंघांत उमेदवारी दिली होती. मात्र यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत नाही.

‘स्वाभिमानी’त फूट पडून सदाभाऊ खोत मंत्री झाले. त्यांना उमेदवारी नाकारली असली तरी ते आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रचारात आहेत. आठवले यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. 

जानकर यांनाही उमेदवारी न देता त्यांच्या पक्षाच्या संबंधित कांचन कुल यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रत्यक्ष घटक पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना उमेदवारी नाही. त्यामुळे घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांत मरगळ असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP Other Party Publicity depressed Politics