Loksabha 2019 : धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याचीही तोंडी तक्रार आली होती. पण तपासाअंती त्यात तथ्य आढळले नाही, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. जोंधळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाबाबत माहिती दिली. या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या "बी 4' या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी "राष्ट्रवादी'च्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Dhananjay Munde Code of Conduct Crime