Loksabha 2019 : पाकिस्तानचे पाणी बंद करू - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे जाणाऱ्या तीनही नद्यांचे पाणी बंद करू, असा इशारा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

सोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे जाणाऱ्या तीनही नद्यांचे पाणी बंद करू, असा इशारा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची आज सोलापुरात सभा झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, डॉ. महास्वामी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, पाकिस्तान नेहमीच सीमेवर कुरापती करत असतो. त्यामुळे १९६० मध्ये केलेल्या कराराचा भंग होत आहे. आम्ही मुसलमानांच्या नव्हे तर दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे संधिसाधू राजकारणी आहेत. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी ‘गरिबी हटाव’ची घोषणा दिली होती. आता त्यांचा पणतूही तीच घोषणा देत आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Pakistan Water Close Nitin Gadkari Politics