Loksabha 2019 : राज ठाकरेंची बुधवारी नांदेडमध्ये सभा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 एप्रिल 2019

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत.

राज ठाकरे यांनी या संदर्भात शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभास्थळांची आणि तारखांची निश्‍चिती झाल्याची माहिती आहे.

14 एप्रिलपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात म्हणजेच नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. 14 एप्रिल ते 19 एप्रिल असा राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचा पहिला टप्पा असेल.

सर्व सभांचे आयोजन मनसेच्या माध्यमातून केले जाणार आहे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कुठलेही स्थानिक पदाधिकारी मनसेच्या व्यासपीठावर नसतील, असे मनसेतून सांगण्यात आले.

राज ठाकरेंच्या सभा
14 एप्रिल : नांदेड
15 एप्रिल : सोलापूर
16 एप्रिल : इचलकरंजी (कोल्हापूर)
17 एप्रिल : कराड (सातारा)
18 एप्रिल : खडकवासला (पुणे)
19 एप्रिल : पेण किंवा अलिबाग (रायगड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Raj Thackeray Speech Nanded Politics