Loksabha 2019 : ‘शिशुपाल मोदींच्या १०० चुका’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, मधुसूदन मिस्त्री, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. या पुस्तिकेत मोदी सरकारच्या कार्यकाळातील चुकांवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. ‘अच्छे दिन’ नारा घेऊन आलेले मोदी सरकार प्रत्यक्षात सर्व स्तरावर अपयशी ठरले असल्याचे यात म्हटले आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने उभारलेला विकासाचा डोलारा मोदींच्या कारकीर्दीत कोसळला आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर, असा प्रकार मोदींनी नोटाबंदी राबवताना केला. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला ना दहशतवाद, कोट्यवधी नागरिकांचा रोजगार बुडाला. २००८ च्या जागतिक मंदीतही तग धरून राहिलेली भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे रुग्णशय्येवर पडली आहे. राफेलच्या माध्यमातून मोदी भांडवलदार मित्रांचे हितसंबंध जपण्यासाठी कुठल्या थराला गेले, हेसुद्धा पुढे आले आहे. देशात धार्मिक उन्माद भडकवण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकारने जीएसटीची चुकीची अंमलबजावणी केल्यामुळे कर कमी होणे अपेक्षित होते, पण जीएसटी लागू असलेल्या ११५ देशांपैकी सर्वाधिक कर वसूल करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.

शेतकऱ्यांविषयी...
    कर्जमाफीची मागणी केंद्राने धुडकावली.
    मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीचा लाभ कोणाला.
    हमीभावाची प्रतीक्षाच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Shishupal Modinchya 100 Chuka Book Congress Politics