Loksabha 2019 : जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या सरकारला उलथवून लावा - शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

कऱ्हाड :  जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले. भाजपच्या सरकारने धनगर, मुस्लीम, मराठा व दलीत समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेला भ्रष्ट्राचार करून त्यातही गैरव्यवहार करून फसवणूक केली आहे. त्यामुळे फसवेगीरी हेच या सरकारची वैशिष्ठ्य आहे. त्याच सरकारला धडा शिकवा, असेही त्यांनी यावेळी जाहीर आवाहन केले.

कॉग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीची जाहीर सभा व प्रचार शुभारंभ येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, पिपल्स पार्टीचे जोगेंद्र कवाडे, सुमनताई पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. इंद्रजित मोहिते, दलीत महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, मलकापूरच्या नगराध्यक्षा  निलम येडगे, पालिकेतचे उपाध्यक्ष जयवंत पाटील, उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतून प्रचाराचा शुभांरभ करत आङे, त्यामागेही विचारांची बांधणी आहे, असे सांगून  पवार म्हणाले, पाच वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैर वापर केला आहे. खोट्या घोषणा केल्या आहेत. ते आपण अनुभवत आहोत. चार वर्षात मोदी सरकारच्या काळात देशात बारा हजारेपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेले नाही. कर्ज माफीची घोषणा केली. त्यावेळी 34 हजार कोटी होईल असे जाहीर केले, प्रत्यक्षात पन्नास टक्के कर्ज माफ झाले नाही. ऑनलाईन कर्जाच्या नोंदी झाल्या. त्यासाठी शेतकऱ्यांच्या घरादाराचे अर्ज भराण्या आले. मात्र त्याचा फायदा शहरी शतेकऱ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेतकरी मात्र देशोधडीला लागला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. आघाडी सरकरच्या काळातही शेतकऱ्यांच्या आतम्हत्या झाल्या. मात्र त्याचे प्रमाण वाढताच आम्ही अवघ्या दहा दिवसात 70 हजार कोटींची कर्जमाफी साऱ्या देशात एकाच वटहूकूमाने केली. ती कणव या सरकारकडे नाही. 

पवार म्हणाले, राफेल विमानाच्या खरेदीत मोठा गैर व्यवहार झाला आहे. राफेलची पहिली किंमत 350 कोटी होती. ती वाढवून 2016 मध्ये 600 कोटी सागंण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्याची खरेदी फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी त्याची किंमत 1 हजार 660 कोटींची होती. ही किंमत कसी वाढली याचा खुलासा आम्ही सरकारकडे मागितला. त्यावेळी गोपनियता असल्याने माहिती न देता आमची मागणी धुडकावली. प्रत्यक्षात कोर्टाने माहिती मागितली त्यावेळी राफेल खरेदीची कागदपत्रे चोरीस गेल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनतर पुन्हा संरक्षण खात्याच्या कपाटातून फोटो कॉपी चोरीस गेल्याचे सागंण्यात आले. हा सगळा फसववेगिरीचा खेळ आहे. पुलावामा हल्ल्यानंतरही असेच झाले. हवाई दलाने मोठी कामगिरी केली. त्याला सलामच आहे. मात्र त्यांच्या शौर्याचे राजकीय फायद्यासाठी भाजप सरकार लाभ उठवत आहे. देशाचे संरक्षण मंत्री असताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी चीनचा हल्ला परतवला, पाकिस्तानला नमवले. माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी घुसखोरी रोखली. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करून वेगळा  बांग्लादेश निर्माण केला. ही सगळी कामगिरी कॉग्रसेच्या काळात झाली. मात्र त्याचा कधीही राजकिय फायदा कॉंग्रेसने घेतला नाही. मात्र सध्याचे सरकार अत्यंत वाईटपणे वागून जवानांच्या शौर्याचे राजकिय स्वार्थासाठी वापर करून घेत आहे. 

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण म्हणाले, मतांची विभागणी करण्यासाठी भाजप राजकीय नेत्यांची पळवापळव करत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आघाडीकडून केवळ एकच उमेदवार दिला जात आहे. देशात भाजप सरकारकडून केवळ घोषणांचाच बाजार होतो आहे. त्याला बळी न पडता मतदान करा. आजपर्यंत त्यांनी केलेल्या घोषणा केवळ 28 टक्केच पूर्ण झाल्या आहेत. तेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राफेलच्या खरेदीचा घोटाळा हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. असा घोटाळा जगाच्या पाठिवर कोणीही केलेला नाही. उदयनराजे सामान्यांच्या कामासाठी मोठ्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारल्याशिवाय राहत नाही. भाजप सरकारला रोखायचे असेल तर सगळे मतभेद विसरून उदयनराजे यांच्या मागे ठामपमे उभे रहा. त्यांना मोट्या मताधिक्क्याने विजयी करा 

विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, तुम्हीच एकटे उदयनराजे भोसले यांचे चाहते नाही आहात. आम्हीही त्यांचे चाहते आहोत. सभेत दंगा करणाऱ्या युवकांना उ्द्देशून विधान व्यक्त केले. उदयनराजे यांची क्रेझ आजही अत्यंत चांगली टिकून आहे. हे पाहुन आनंद वाटला. उदयनराजे भोसले यांचे भाषण ऐकण्याची जशी तुमची इच्छा आहे. तशी आम्हालाही त्याची उत्सुकता आहे. असे त्यांनी स्पष्ट करताच टाळ्यांचा गजर झाला.

पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्री अशताना विमान तयार करण्याचे तीन कारखाने देशात निर्माण केले. त्यात नासिक, बंगळूर व लखनऊ येथे ते कारखाने उभे आहेत. ते काँग्रेसचे धोरण आहे. मात्र त्याउलट काम मोदी सरकार करत आहे. ज्यांनी कधी शाळेत कागदाचेही विमान तयार केले नाही. अशा अंबानींच्या रिलायन्स कंपनीला त्यांनी विमान बनविण्याचे टेंडर दिले आहे. त्यामुळे चव्हाण यांनी तयार केलेले तिन्ही कारखाने बंद करून अंबानींना जगविण्याचा धंदा करणाऱ्या भाजपला धडा शिकवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com