Loksabha 2019 : औरंगाबादमध्ये तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान   

प्रकाश बनकर
मंगळवार, 23 एप्रिल 2019

औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले. 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकळी सात वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चौरंगी लढत होत असून मतदार संघात 18 लाख 86 हजार 286 मतदार आहेत. यात महायुतीचे चार वेळा खासदार रहिलेले चंद्रकांत खैरे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे हर्षवर्धन जाधव यांची उमेदवार आहे. प्रत्येक बुथवर सकाळपासून मतदारांची मोठी गर्दी होत आहेत. 2014 च्या तुलनेत 2019ला वाढेलले मतदारानुसार टक्‍केवारी वाढण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहेत. 

तीन वाजेपर्यंत असे झाले मतदान 
औरंगाबाद मध्य - 45.68 टक्‍के 
औरंगाबाद पश्‍चिम - 46.11 टक्‍के 
औरंगाबाद पुर्व- 48.12 टक्‍के 
कन्नड - 48.34 टक्‍के 
गंगापूर-खुलताबाद - 48.12 टक्‍के 
वैजापूर- 42.22 टक्‍के 
एकुण जिल्ह्यात - 46.44 टक्‍के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Lok Sabha poll 46.44 percent polling till 3 pm