Loksabha 2019: मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील

Loksabha 2019: मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील

शेंबाळपिंप्री (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल (ता. 18) मतदान झाल्यानंतर आज, शुक्रवारी (ता. 19)  ईव्हीएम मशीन हिंगोली येथे पोहोचवत असताना ईव्हीएम भरलेली लोखंडी पेटी ट्रकमधून रस्त्यावर पडली. ट्रक पुढे निघून गेल्यावर ही बाब सुरक्षा कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम कडेकोट सुरक्षेत तातडीने स्ट्रॉंगरुमपर्यत पोहोचवावी लागते. परंतु, शेबाळपिंप्रीपासून एक किमी अंतरावर ट्रकमधून ईव्हीएम असलेली लोखंडी पेटी रस्त्यावर पडली. सदर बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दूर गेलेल्या ट्रक व रस्त्यावर पडलेल्या पेटीचे फोटो काढले. तोपर्यंत पोलिस व्हॅन पोहोचली. त्यांनी पेटी पुन्हा ट्रकमध्ये टाकली. त्यानंतर ट्रक हिंगोलीचा दिशेने निघून गेला. या पेट्या कुठल्या मतदारसंघातील आहेत, हे मात्र कळू शकले नाही.

काल उमरखेड विधानसभा मतदारसंघात मतदान झाले असून बहुधा या पेट्या उमरखेड येथून हिंगोली येथे जात होत्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ट्रकचा क्रमांक एम. एच. 26 ए. डी. 8369 असल्याचे दिसून येते. मतपेट्यांची वाहतूक करताना इतका निष्काळजीपणा दिसून आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काल रात्रीतूनच पेट्या स्ट्रॉंग रुमपर्यत पोहोचवणे आवश्यक असताना त्या रात्रभर पोलिंग सेंटरवर का ठेवण्यात आल्या, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com