Election Results : हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले असून काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा त्यांनी पराभव केला आहे. हिंगोली मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोेड हे राहिले आहेत.

लोकसभा निकाल 2019
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली असून उमेदवारांसह समर्थकांची धडधड वाढू लागली आहे. निवडणुकीत वंचितच्या मतांवरच विजयी उमेदवारांचे गणित अवलंबून दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात थेट लढत येथे पाहायला मिळाली.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले असून काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा त्यांनी पराभव केला आहे. हिंगोली मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोेड हे राहिले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली, वसमत, कळमनुरी या विधानसभा मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Hemant patil and Subhash Wankhede in Hingoli constituency for Lok Sabha 2019