Election Results : परभणीत शिवसेनेचे संजय जाधव विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

परभणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाल्यामुळे आज गुरुवारी (ता.23) लागणारे निकाल लक्षवेधी ठरणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव बालेकिल्ला अभेद्य राहू देतील की राष्ट्रवादी कॉग्रेसचे राजेश विटेकर बाजी मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण येणार... ? कितीने येणार..? याची चर्चा असून मतमोजणीला सुरवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनीही यावेळी चांगलाच जोर लावलेला दिसून आला.

लोकसभा निकाल 2019
परभणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाली पण, सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचाही यावेळी चांगलाच जोर दिसून आला.

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव यांना 538941 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर राहिले त्यांना एकूण असून त्यांना 496372 मते पडली आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान हे राहिले असून त्यांना एकूण 149834 मते मिळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Sanjay jadhav and rajesh Vitekar in Parbhani constituency for Lok Sabha 2019