esakal | Loksabha 2019 : औरंगाबाद मतदारसंघात कोण होणार खासदार?
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Constituency

सोशल मीडियावर वातावरण टाईट
मतदान झाल्यानंतर औरंगाबादेत कोण खासदार होणार, यावर काही जण मते मागवत आहेत; तर अमुक-अमुक उमेदवार विजयी होणार, आमचाच विजय पक्का आहे. अशा खुल्या पोस्ट टाकल्या जात आहेत. काही जणांनी कुठे कोण कसा चालला, याची माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. इतकेच नव्हे, तर काही जणांनी आकडेमोड करून कोणत्या उमेदवाराला किती मते पडणार, याची आकडेमोडसुद्धा केलीय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या राजकीय वातावरण चांगलेच टाईट झाले आहे.

Loksabha 2019 : औरंगाबाद मतदारसंघात कोण होणार खासदार?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीत काट्याची टक्कर झाली. त्यामुळे कुणाला किती मते पडणार? कोण कुणाची मते खाणार? दोघांच्या लढतीत तिसऱ्याचा फायदा होणार का? निकाल धक्कादायक लागणार? पगंत उडाला, ट्रॅक्‍टर धावला, बाणाने अचूक नेम साधला, की पंजा चालला अशीच चर्चा शहरांपासून गावागावांत रंगली आहे.

मतदान झाले तसे कुठेही गेले तरी तुमच्याकडे कुणाची हवा होती, कोण चालला, आता कोण जिंकणार, याचीच आकडेमोड सुरू आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आम्हीच जिंकणार असा दावा केला जात असला, तरी सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा आकडेमोड करून आपले विजयाचे गणित मांडत आहे. औरंगाबादेत इतकी टफ फाईट झाली, की भल्याभल्यांना अंदाज बांधता येणे अवघड झाले आहे. कुणी अंदाज बांधला तरी त्यामध्ये जर-तर असा प्रश्‍न उपस्थितीत राहतोय. तर काही जणांनी अमुक-अमुक उमेदवारच विजयी होणार यावर पैजा लावायला सुरवात केलीय. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार मैदानात असले, तरी टक्कर चार उमेदवारांत झाली. प्रचारादरम्यान चार पक्षांच्या उमेदवार, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्याने; तसेच स्टार प्रचाराकांनी सभा गाजविल्याने रणरणत्या उन्हातही राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता मतदान झाल्यानंतरही औरंगाबाद शहरातील अंदाज बांधणे अवघड झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६३.४१ टक्के म्हणजेच ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. आता यावरून प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या परीने आकडेमोड करून अंदाज बांधत आहेत.

कोणत्या वसाहती, भागात कोण चालला, येथील बूथच्या टक्केवारीवरून अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये प्रत्येकजण काठावर का होईना; पण आम्हीच जिंकणार असे सांगताना दिसतो; पण कोण विजयी होणार, हे छातीठोकपणे कुणालाही सांगणे अवघड झाले आहे.

loading image