Election Results : वायव्य मुंबईत काँग्रेसचे संजय निरुपम पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित आहे.

लोकसभा निकाल 2019 : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित होत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान आहे. गजानन कीर्तिकर सध्या आघाडीवर आहेत. तर निरुपम पिछाडीवर आहेत.

गजानन कीर्तिकर यांना 176387 मते मिळाली असून, काँग्रेसचे संजय निरूपम यांना 95059 मते मिळाली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. कामत यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेस कीर्तिकरांविरुद्ध कोणाला उतविणार याबाबत विविध नावांची चर्चा होती. पण, आपल्या आंदोलनामुळे पक्षश्रेष्ठींकडे विश्वास निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांना संधी देण्यात आली. तरी त्यांना विजय मिळणे कठीण असून, कीर्तिकरांची खासदारकी कायम राहणार असल्याचे या निकालातून दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gajanan Kirtikar leading in Northwest Mumbai Loksabha Constituency for Lok Sabha 2019