Loksabha 2019 : राज तुम्ही करू नका जास्त नखरे... : रामदास आठवले

ramdas athawale
ramdas athawale

मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

आठवले म्हणाले, 'राज ठाकरे आठ दिवस गुजरात मध्ये राहिले. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली. महाराष्ट्र सरकारने गुजरातची भूमिका स्वीकारावी, असेही म्हणाले. मात्र, तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा टीका करायचे पण अशा टीका त्यांनी कधी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच 56 विरोधक एकत्र आले आहेत. त्यात आता 57 नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही. सभेला गर्दी खेचण्याचे नियोजन राज ठाकरे यांच्याकडे आहे. पण, उमेदवार कसे निवडून आणायचे हे नियोजन आमच्याकडे आहे.'

आठवले म्हणाले...
राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण
बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी - काँग्रेस सोबत गेले आहेत राज
म्हणुनच इथे आलो आहे मी आज
कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज...

आठवले यांनी पंतप्रधानांची स्तुती करताना राज ठाकरेंवर कवितेतून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com