Loksabha 2019 : जेथे पवार तेथे राज यांची स्क्रिप्ट - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला.

मुंबई - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला. 

तावडे म्हणाले की, काल राज यांच्या टुरिंग टॉकीजचा शो पाहिला. त्यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक हे आता जाहीर करावे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या योजना फसलेल्या असतील तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका येथे होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणे हे कशाचे प्रतीक आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Raj Thackeray Script Vinod Tawde Politics