Satara Loksabha 2019 सातारा लाेकसभा मतदारसंघात साडे तीन टक्के वाढले मतदान

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 24 एप्रिल 2019

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 38 हजार 139 मतदारांपैकी 11 लाख 94 हजार 434 मतदारांनी (60.33 टक्के) मतदानाचा हक्क बजाविला.विधानसभा निहाय मतदानांमध्ये सर्वाधिक कऱ्हाड दक्षिणमध्ये 63.11 टक्के तसेच पाटणमध्ये 55.87 टक्के मतदान झाले.
सातारा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.23) मतदान झाले. या मतदारसंघात एकूण 18 लाख 38 हजार 139 इतके मतदान आहे. त्यापैकी 11 लाख 94 हजार 434 जणांनी मतदान केले. यामध्ये 5 लाख 79 हजार 155 (61.88 टक्के) पुरुषांनी तसेच 5 लाख 30 हजार 277 (58.72 टक्के) महिलांचा समावेश आहे. तृतीयपंथी 17 मतदारांपैकी केवळ दोन मतदारांनी मतदान केले आहे.

विधानसभा निहाय मतदान असे : वाई - 60.36, कोरेगाव : 60.65 , कराड उत्तर : 63.04, कराड दक्षिण : 63.11, पाटण : 55.87, सातारा : 59.22 - एकूण ः 60.33.
गतवेळच्या (सन 2014) लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात 56.79 टक्के मतदान झाले होते. यामध्ये यंदा 03.54 टक्‍यांनी वाढ झाल्याचे दिसते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना-भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यापैकी कोणाला मतदारांनी कौल दिला आहे हे 23 मे दिवशी समजणार आहे.

Web Title: 60.33 % Polling in Satara Constituency