esakal | Loksabha 2019 : भाजप उमेदवाराने केली फेरमतदानाची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : भाजप उमेदवाराने केली फेरमतदानाची मागणी 

भाजपच्या पोलिंग एजंटांना मतदान केंद्रांवरुन हाककल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेर मतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रांवरील अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे.

Loksabha 2019 : भाजप उमेदवाराने केली फेरमतदानाची मागणी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 च्या सुमारास निमगावसह अन्य काही गावांमधील भाजपच्या पोलिंग एजंटांना मतदान केंद्रांवरुन हाककल्याचा आरोप करत येथील मतदान प्रक्रिया रद्द करावी, फेर मतदान घ्यावे आणि संबंधित केंद्रांवरील अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. माढ्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 44.10 टक्‍के मतदान झाले होते.

माढा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य दिग्गजांच्या सभा झाल्या. सुरुवातीला या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे निवडणूक लढविणार होते परंतु, त्यांनी अचानक माघार घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. भाजपकडून रणजितसिंह मोहिते-पाटील अथवा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमदेवारी मिळेल, अशी शक्‍यता होती. मात्र, फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना कॉंग्रेसमधून भाजपमध्ये घेऊन उमदेवारी देण्यात आली.

मोहिते-पाटील यांच्या अस्तित्वाचा तर शरद पवार यांच्या प्रतिष्ठेच्या या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी दोन्ही उमदेवारांनी कंबर कसली आहे. मतदारांची उत्सुकता अन्‌ संजय शिंदे यांचा मतदारसंघातील बोलबाला, या पार्श्‍वभूमीवर रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळा, सांगोला, पंढरपूर या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माढ्यातच ठाण मांडल्याचेही पहायला मिळाले. 

loading image