Election Results : नगरमध्ये सुजय विखेंचा विजयी 'संग्राम'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवसावर येऊन ठेपला असताना लोकामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. अकोले - संगमनेर तालुका शिर्डी लोकसभा मतदार संघात आहे .हा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघात निवडणुकीत उत्साह पाहायला मिळाला नाही माञ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन दिग्गज घराण्यातील उमेदवारामध्ये झालेली लढत त्यात थोरात - विखेची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे निवडणूक अटीतटीची झाली.

नगर : नगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांच्यावर मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 

नगर मतदारसंघ 20 व्या फेरीची एकूण अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली असून, एकूण मतमोजणी 9 लाख 77 हजार 38  त्यापैकी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना 5 लाख 72 हजार 567, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना 3 लाख 44 हजार 324 मते मिळाली. त्यानुसार डॉ. विखे 2 लाख 28 हजार 243 मतांनी पुढे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांना 24 हजार 909 मते मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवसावर येऊन ठेपला असताना लोकामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. अकोले - संगमनेर तालुका शिर्डी लोकसभा मतदार संघात आहे .हा मतदारसंघ राखीव असल्याने या मतदारसंघात निवडणुकीत उत्साह पाहायला मिळाला नाही माञ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दोन दिग्गज घराण्यातील उमेदवारामध्ये झालेली लढत त्यात थोरात - विखेची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. निवडणुकीचा निकाल जवळ आलेला असताना गावा गावात पारावर ,कट्ट्यावर ,चाैकात निवडणूक निकालाविषयी तसेच देशाचे,राज्याचे समीकरण काय असेल? यावर चर्चा सुरु आहे. त्यात भर ती टी व्ही वरील एक्झिट पोल च्या अंदाजाची.

अकोले तालुक्यात चर्चा होताना प्रामुख्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निकाला विषयी चर्चा होण्यापेक्षा नगर दक्षिण मधून सुजय विखे विजयी होणार कि संग्राम जगताप विजयी होणार यावरच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.अनेक राजकीय कार्यकर्त्यामध्ये तर सुजय कि संग्राम यावर पैजाही लागलेल्या आहेत .एकूणच उत्तरेच्या लोकांना दक्षिणेचीच उत्सुकता जास्त आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Close fight between Sujay Vikhe Patil and Sangram Jagtap in Nagar for Lok Sabha 2019