त्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते ः उदयनराजे (व्हिडिआे)

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 24 मे 2019

सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आज (शुक्रवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळास अभिवादन केले. त्यानंतर खासदार उदयनराजेंनी पत्रकारांशी संपर्क साधला. ते म्हणाले 11 राज्यामध्ये कॉंग्रेसला एक ही जागा मिळत नाही आणि त्यांची पिछेहाट होती ही बाब न पटणारी आहे. ही निवडणुक प्रक्रिया शंकास्पद आहे. परदेशात बॅलेट पेपरचा वापर केला जाताे. परंतु आपल्याकडे विराेध असतानाही मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर केला जाताे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे ही उदयनराजेंनी नमूद केले.
दरम्यान ज्यांनी मला मतदान केले आणि केले नाही या सर्वांचे मी काम करणार आहे. मी कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करीत नाही आणि यापुर्वी ही केलेला नाही. भविष्य काळात ही करणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न करीन. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was not neccessary to conduct elections says MP Udayanraje Bhonsle