SakalSaamExitPolls : पश्चिम महाराष्ट्रात युती, आघाडीला समान जागा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा पाच जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोल 2019 : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा पाच जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली. 

महाराष्ट्राचा अचूक अंदाज सकाळ आणि साम वाहिनीने दिला आहे. सर्वांत विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 10 जागा असून यापैकी भाजपला 4, शिवसेनेला 1 अशा एकूण पाच जागांवर युतीला विजय मिळेल. तर, राष्ट्रवादीची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मागील चारही जागा कायम राखण्यात यश मिळेल असे चित्र आहे. याबरोबर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानीची जागा आघाडीकडे राहिल असे चित्र आहे. त्यामुळे आघाडी आणि युती या दोघांनाही समसमान यश मिळताना दिसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Saam Exit poll result of Loksabha Election For West Maharashtra