Lok Sabha 2019 : काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नाहीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

आजोळ म्हणून पहिल्यांदा कोल्हापूर
श्री. पवार यांनी दहा जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांनी या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा कोल्हापूरची निवड केल्याबद्दल श्री. पवार यांचे आभार मानले. त्यावर श्री. पवार यांनी आपले आजोळ कोल्हापूर म्हणूनच पहिल्यांदा हा जिल्हा

कोल्हापूर - लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नाहीत, अशी तक्रार आज कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी थेट ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.

श्री. पवार यांनी जिल्ह्यातील बूथप्रमुख, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांची मते ऐकली.

कार्यक्रमात मागासवर्गीय सेलचे विश्‍वजित कांबळे यांनी आघाडीबाबतचा प्रश्‍न विचारला. ते म्हणाले, ‘‘दोन्ही काँग्रेसची आघाडी असूनही एकत्रित प्रचार होत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नाहीत.’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यातील ४८ पैकी ४५-४६ जागांवर आघाडीत एकमत झाले आहे. उर्वरित दोन-तीन जागांचा प्रश्‍न आहे, तो निकालात काढल्यानंतर सर्व सुरळीत होईल. कोल्हापूर हा शाहू महाराजांच्या विचारांचा जिल्हा आहे. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा तो बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात पुरोगामी विचारांच्या विरोधात काही होणार नाही.’’

आजोळ म्हणून पहिल्यांदा कोल्हापूर
श्री. पवार यांनी दहा जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांनी या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा कोल्हापूरची निवड केल्याबद्दल श्री. पवार यांचे आभार मानले. त्यावर श्री. पवार यांनी आपले आजोळ कोल्हापूर म्हणूनच पहिल्यांदा हा जिल्हा घेतल्याचे सांगितले.

ल्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. पण, आपण त्यात कमी पडलो. नव्या पिढीच्या हातात आता मोबाईल आहे, हा घटक डोळ्यांपुढे ठेवून पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी या मीडियाचाही वापर या निवडणुकीत प्रभावीपणे आपल्या पक्षांकडून करावा, असे श्री. पवार यांनी यासंदर्भात ‘राष्ट्रवादी युवक’चे रोहित पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या फसलेल्या योजनांची माहिती पक्षामार्फत पुरवली जाईल, असेही त्यांनी महेंद्र चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर सांगितले. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार आल्यापासून युवती व महिला सुरक्षित नाहीत, याचीही जनजागृती प्रचारात झाली पाहिजे, असे ‘राष्ट्रवादी’ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी सांगितले. कर्जमाफीचा निर्णय घेताना त्यात शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच भूमिका असेल. पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यात याचा योग्य असा उल्लेख केला जाईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

मुश्रीफ जिल्हा बॅंकेतच
एकीकडे श्री. पवार यांचा व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कार्यकर्त्यांशी संवास सुरू असताना त्याचवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ जिल्हा बॅंकेतच बसून होते. सुमारे तासभर ते बॅंकेत होते, हा कार्यक्रम संपल्यानंतर ते परत गेले. श्री. महाडिक यांनी मात्र नियोजित कार्यक्रमानुसार श्री. मुश्रीफ मतदार संघात असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Video conference with Kolhapur activists