Election Results : आले रे आले रे आमचे उदयनराजे !

Thursday, 23 May 2019

सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा सुमारे 82 हजारांचे  मताधिक्य घेतले आहे. आत्तापर्यंत (दुपारी तीन) एकूण आठ लाख 57 हजार 453 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजे भाेसले यांना 4 लाख 56 हजार 370 मते, नरेंद्र पाटील यांना 3 लाख 74 हजार 111 मते तसेच वंचित बहुजन आघाडीचे सहदेव एवळे यांना 33 हजार 047 इतके मते मिळाली आहेत.

दरम्यान अद्याप दिड लाख मतांची मोजणी राहिली आहे. सद्य परिस्थितीमध्ये उदयनराजेंना गतवेळच्या मताधिक्यच्या दहा टक्केही मताधिक्य मिळालेले नाही. गत वेळी त्यांचे मताधिक्य तीन लाख 66 हजार इतके होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने सातारा शहरात त्यांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी त्यांचे अभिंनदन करणारे फलक उभे केले आहेत. तसेच गल्लाेगल्लीतील युवक आले रे आले रे आमचे उदयनराजे असा जयघाेष करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje bhonsle leads in satara Constituency