Loksabha 2019 : मावळमध्ये निवडणुकीदरम्यान वाटपाचे 28 लाख जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मे 2019

पिंपरी : निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान होणाऱ्या पैशाच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. या विभागाने मावळ मतदारसंघातून 28 लाख 28 हजार रुपयांची रोकड जप्त केली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय भरारी आणि तपासणी पथक विविध वाहनांची तपासणी करत होते. 

पिंपरी : निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान होणाऱ्या पैशाच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. या विभागाने मावळ मतदारसंघातून 28 लाख 28 हजार रुपयांची रोकड जप्त केली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय भरारी आणि तपासणी पथक विविध वाहनांची तपासणी करत होते. 

या रकमेपैकी सर्वाधिक 13 लाख रुपये मावळ परिसरातून जप्त करण्यात आले. पनवेलमधून साडेनऊ लाख रुपये, उरणमधून तीन लाख 21 हजार रुपये, चिंचवडमधून एक लाख 97 हजार रुपये आणि पिंपरीमधून 48 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 19 ते 28 एप्रिलदरम्यान करण्यात आली. अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने 28 तपासणी नाके उभारले होते. या ठिकाणी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. त्याचे चित्रीकरणदेखील करण्यात आले आहे. 

सर्वाधिक भरारी पथके उरणमध्ये यावर नजर ठेवण्यासाठी सर्वाधिक भरारी पथके ही उरण, चिंचवड आणि मावळमध्ये ठेवण्यात आली होती, तर तपासणी नाक्‍यांची संख्या पनवेलमध्ये जास्त होती. विशेष तपासणी पथकांची संख्यादेखील या परिसरात जास्त होती. या आर्थिक व्यवहारांवर प्राप्तिकर खात्याचीही नजर होती. त्यामुळे नागरिकांना याबाबत माहिती असल्यास त्यांनी प्राप्तिकर खात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

निवडणूक विभागाची कारवाई 
विभाग     तारीख       रक्‍कम 
पनवेल     27 एप्रिल    9,00,000 
              28 एप्रिल        43,800 
उरण        27 एप्रिल     3,21,550 
मावळ       5 एप्रिल         79,200 
                9 एप्रिल      6,00,000 
              19 एप्रिल      3,00,000 
              19 एप्रिल      2,00,000 
              25 एप्रिल      1,38,000 
चिंचवड      4 एप्रिल        85,000 
               20 एप्रिल    1,12,000 
पिंपरी       29 एप्रिल      48,500 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 lakhs of allocation Confiscated during elections in Maval