Election Result : श्रीरंग बारणेंना सव्वा दोन लाखांचे मताधिक्‍क्‍य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांच्यावर दिड लाख मतांपर्यंत आघाडी वाढवली आहे.

पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. 

बारणे यांना या फेरीअखेर 7 लाख 18 हजार 950 तर पवार यांना 5 लाख 3 हजार 375 मते मिळाली. त्यामुळे ही आघाडी 2 लाख 15 हजार 575 इतकी झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना 75 हजार 713 इतकी मते मिळाली. तत्पूर्वी बारणे यांना 28 व्या फेरीअखेर 7 लाख 16 हजार 603 तर पार्थ यांना 5 लाख 668 मते मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: barane is leading 2 Lackh 15 thousand votes in maval