
मावळ : मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर तब्बल 20 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. बारणे यांना 87 हजार 477 तर पार्थ पवार यांना 67 हजार 711 मते मिळाली आहेत. वंचित चे राजाराम पाटील यांना 7 हजार 306 मते मिळाली.
मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार हे सुमारे एक हजार 58 मतांनी पिछाडीवर पडले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान खासदार, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना 6 हजार 668 तर पवार 5 हजार 810 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 472 मते प्राप्त झाली आहेत. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे एकूण मतमोजणी प्रक्रियेची अंतिम पाहणी करीत आहेत. दरम्यान, विविध उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना सकाळी सात वाजता मतमोजणी कक्षात सोडण्यास सुरवात करण्यात आली. त्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. मोबाईल किंवा तत्सम कोणतेही उपकरण आतमध्ये नेण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात लढत आहे. पार्थ हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. वंचित विकास आघाडीकडून राजाराम पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.