
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे.
बापट म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली पाच वर्ष उत्तम काम करुन देश विकासाकडे नेला. प्रगतीकडे नेला. सर्व योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित केली. आम्हांला महाष्ट्रातील यश अपेक्षित होते. ज्या पद्धतीने देशाचा विचार करुन नरेंद्र मोदींनी काम केले अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काम केले आहे. शेतकरी, महिला आणि मागासवर्गीयांना केंद्रबिंदू मानून योजनांची आखणी केली. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुदान, ग्रामीण भागातील महिलांकरीतांच्या योजना असो अथवा अन्य योजना या सर्व योजना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम केले. सर्व मंत्रीमंडळ, सर्व आमदार, राज्यातील खासदार यांनी चांगले काम केले. या निवडणुकीचे यश म्हणजे संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली. यामुळे दुधात साखर पडली. सेना- भाजपच्या विचारांमुळे कार्यकर्ते एकत्र आल्याने आज आम्ही फार मोठी उसंडी महाराष्ट्रात मारली आहे.
मी नगरसेवक, आमदार नंतर मंत्री झालो. मी मंत्री पदाचा उपयोग जनसामान्यांसाठी केला. सार्वजनिक कामांत मी सतत व्यस्त राहिलो. सामन्या माणसांना मी त्यांचा वाटू लागलो. त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी ते माझ्याकडे विश्वासाने येतात. पुणे शहराच्या विकासाचा मी दावेदार ठरलो. मेट्रो, विमानतळ, पाणी पूरवठ्याची योजना अशा पुण्यातील अनेक योजना कागदावर राहिल्या होत्या. पालकमंत्री या नात्याने मी पूढे नेऊ शकलो. माझ्यामागे येथील सर्व खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेचे काम केले. पुण्यातून माझा लाखाच्या फरकाने विजय होईल असा मला आत्मविश्वास होता.
"माज्या रे नादाला लागू नको"
दरम्यान मतमोजणी केंद्रावरून घरी आले भाजपचे गिरीश बापट दीड वाजता शहर कार्यालयाला दाखल झाले. यावेळी पक्ष्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे गुलाल उधळून त्यांचे स्वागत गेले. "माज्या रे नादाला लागू नको" हे गाणे यावेळी लावण्यात आले होते.
बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते कार्यालयात आले आहेत. भाजपाचा विजय असो, गिरीश बापट जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद, राज टिळक की करतो तयारी आ रहे हे भागवाधारी, भारत माता की जय अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.