कारणराजकारण : विकासासाठी जनवाडीतील तिसऱ्या पिढीचा संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

कारणराजकारण : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी 'या' वातावरणात निभावणार आहे मतदानाचा हक्क... सांगताहेत जनवाडीतील नागरीक...

लोकसभा 2019
जनवाडी (पुणे) : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी, सकाळी उठल्यावर नळाला पाणी येणार का? हा उभा राहणारा पहिला प्रश्न आणि घरातून बाहेर पडल्यावर आज तरी हाताला काम मिळणार का? ही धाकधुक. अशा वातावरणात जनवाडीतला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

राष्ट्रावादाबरोबरच हाताला रोजगार हे देखील महत्वाचे आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी हव्या आहेत. या संधीच सोनं करण्याची क्षमता तरुणांकडे असून देखील संधीच मिळत नसल्याची त्यांची शोकांतिका आहे. स्वस्तातील गॅसचा दावा केला जातो, पण हातावरच पोट असणाऱ्यांना मात्र सबसिडी नसलेला सिलिंडर खरेदी करावा लागतो. याबाबतचा या सरकारविरुद्धचा राग 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेतील दुसऱ्या भागात नागरिकांनी व्यक्त केला.

कारणराजकारण या मालिकेत आज (ता. 19) आपण पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातील जनवाडी येथील नागरिकांशी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karanrajkaran Third generation struggling of Janwadi pune for development