Loksabha 2019 : घरासंदर्भातील कोल्हे यांचे पितळ उघडे - बाबूराव पाचर्णे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे.

केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार आहे का’’ असा सवाल आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केला.

महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाघोली येथे झालेल्या कोपरा सभेत पाचर्णे बोलत होते. खासदार आढळराव पाटील म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांत १४ हजार कोटींची कामे केली. लोकसंपर्क, विकासकामात कमी पडलो नाही. 

वाघोलीच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार पाचर्णे आणि माझ्या प्रयत्नांमुळेच पीएमआरडीएच्या बजेटमध्ये २५ कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली. वाघोलीत ३० कोटींची कामे झाली, तर हवेलीत ४३ कोटींपेक्षा जास्त निधी दिला आहे. पुणे-शिरूर रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या डीपीआरचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर करण्याचे मान्य केले आहे. पुणे-शिरूर रस्त्याचे काम आमदार आणि मी दोघेच करणार आहोत, याची खात्री बाळगा.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Amol Kolhe Baburao Pacharne Politics