Loksabha 2019 : प्रज्ञासिंहसारखी प्रवृत्ती मतदानातून ठेचा - हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 April 2019

पालकमंत्री, खासदार कुठे होते? 
पूर्वसूचना न देता, पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्याकडून सक्तीने दंड वसूल करून, त्यांचा मानसिक छळ केला तेव्हा पालकमंत्री गिरीश बापट व खासदार अनिल शिरोळे कुठे होते?, असा सवाल हेल्मेटविरोधी कृती समितीने केला आहे. हेल्मेट सक्तीबाबत निष्क्रिय राहिलेल्या सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींबाबत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समितीच्या ज्येष्ठ सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पुणे - ‘अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा’’, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार शरद रणपिसे, विश्‍वजित कदम, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, रशीद शेख, नगरसेवक अविनाश बागवे, मौलाना निजामुद्दीन, शालक पाटील, राजेंद्रसिंग वालिया, मौलाना काझमी, अमीर शेख, नदीम मुजावर, राजू इनामदार, राजेंद्र नायर, अय्याज खान, श्‍यामला सरदेसाई आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात सरकारचा उल्लेख व्यक्तिगत नावाने करतात. आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी कधी सरकारचा उल्लेख स्वत:च्या नावाने केल्याचे ऐकिवात नाही. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.’’ उल्हास पवार म्हणाले, ‘‘ज्यांचा सामाजिक ऐक्‍यावर, सर्वधर्म समभावावर, पुरोगामित्वावर विश्‍वास आहे त्यांना मतदान न करण्याची चूक आपण केली तर देशात पुन्हा निवडणूक होईल की नाही, अशी स्थिती आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 pragya singh Harshwardhan Patil Politics