Loksabha 2019 : बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘ती’ मतदानाच्या रांगेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात मतदान केले. निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि मुंडावळ्या बांधून त्यांनी केंद्रावर प्रवेश करताच मतदानासाठी आलेले नागरिक त्यांच्याकडे पाहतच राहिले. लग्नाच्या दिवशी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी पहिले मतदान केले आणि त्यानंतर त्या लग्नाच्या ठिकाणी रवाना झाल्या.

पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला.

श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात मतदान केले. निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि मुंडावळ्या बांधून त्यांनी केंद्रावर प्रवेश करताच मतदानासाठी आलेले नागरिक त्यांच्याकडे पाहतच राहिले. लग्नाच्या दिवशी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी पहिले मतदान केले आणि त्यानंतर त्या लग्नाच्या ठिकाणी रवाना झाल्या. श्रद्धा म्हणाल्या, ‘‘आज मी एका नव्या आयुष्याला सुरवात करणार आहे. योगायोगाने त्याच दिवशी मतदान आहे.

त्याचा मला खूप आनंद होत आहे. नव्या आयुष्याला सुरवात करण्यापूर्वी मतदान करणे गरजेचे वाटले. या निर्णयात मला कुटुंबीयांनीदेखील साथ दिली. ’’
‘‘स्त्री सक्षम व्हावी म्हणून सरकार अनेक योजना राबवीत आहे. मात्र, श्रद्धा यांच्याकडे पाहिले असता महिला किती सक्षम झाल्या आहेत, हे दिसते,’’ अशी भावना मतदानासाठी आलेल्या कमला सातपुते यांनी या निमित्ताने यावेळी व्यक्‍त केली.

Web Title: Loksabha Election 2019 Shraddha Bhagat Marriage Voting