Loksabha 2019 : सोशल मीडियावरही प्रचार धुरळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

रोड शो, पदयात्रा, कोपरा सभा आदींबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडियावरही प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. स्वतःचा प्रचार करतानाच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या त्रुटी जाहीरपणे मांडून त्याला गारद करण्याचे तंत्रही या माध्यमातून वापरले जात आहे. 

तसेच काही ठरावीक पोस्ट तयार करून त्या ‘व्हायरल’ करण्यावरही भर 
दिला जात आहे. त्यामुळे ‘नेटिझन्स’चेही या प्रचारावर आता लक्ष केंद्रित 
होऊ लागले आहे.

पुणे - रोड शो, पदयात्रा, कोपरा सभा आदींबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडियावरही प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. स्वतःचा प्रचार करतानाच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या त्रुटी जाहीरपणे मांडून त्याला गारद करण्याचे तंत्रही या माध्यमातून वापरले जात आहे. 

तसेच काही ठरावीक पोस्ट तयार करून त्या ‘व्हायरल’ करण्यावरही भर 
दिला जात आहे. त्यामुळे ‘नेटिझन्स’चेही या प्रचारावर आता लक्ष केंद्रित 
होऊ लागले आहे.

पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतील अनुक्रमे गिरीश बापट व मोहन जोशी, सुप्रिया सुळे व कांचन कुल, श्रीरंग बारणे व पार्थ पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील व डॉ. अमोल कोल्हे आदी उमेदवारांकडून सोशल मीडियावरही प्रचाराला भर दिला जात आहे. सुळे यांनी तर सोशल मीडियावरील प्रचार एक वर्षापूर्वीच सुरू केला आहे. बारामती मतदारसंघातील लहान-मोठ्या गावांना भेटी दिल्या की त्याचे अपडेट लगेच त्या फेसबुकवर टाकत आहेत, तर अन्य पक्षांतील नेत्यांबरोबरील गाठीभेटीही त्या ट्‌विटरवर शेअर करीत आहेत. त्यांचे कार्यकर्ते लगेचच पोस्ट शेअर करून ती व्हायरल करत आहेत. 

शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील अशीच क्‍लुप्ती वापरली आहे. गेल्या पाच वर्षांतील विकासकामांचा आढावा दररोज पोस्टद्वारे ते नेटिझन्सपर्यंत पोचवीत आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. कोल्हे हे आढळरावांच्या सभांना काही ठिकाणी प्रतिसाद कमी मिळाला, तर त्याचे व्हिडिओ लगेचच फेसबुकवर पोस्ट करीत व्हॉट्‌सअपच्या ग्रूपवर व्हायरल करीत आहेत. बापट यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दररोज नव्या पोस्ट तयार करीत आहेत, तर बापट यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याच्या पोस्ट त्यांचे कार्यकर्ते व्हायरल करीत 
आहेत. 

कूलदेखील बारामतीमधील प्रलंबित 
विकासकामे तसेच प्रचाराचा आढावा नियमितपणे सादर करीत आहेत. पार्थ यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनव क्‍लुप्त्या वापरल्या आहेत. घोड्यावरून प्रचाराला जाणे, धावत प्रचार करणे आदींचे व्हिडिओ तयार करून आवर्जून ते मतदारांपर्यंत पोचविले जात आहेत. 

बारणे यांची विकासकामांवरील भिस्त त्यांच्या प्रचारात दिसून येते. काही उमेदवारांनी तर त्यांचे प्रचाराचे दौरे कसे आणि कोणत्या भागात असतील, याचीही माहिती आदल्या दिवशीच फेसबुक, व्हॉट्‌सअप, ट्‌विटरवर शेअर करण्यास सुरवात केली आहे. तसेच काही ठिकाणी ‘ॲप’चाही वापर सुरू झाला आहे.

व्हॉट्‌सअप ग्रुपसाठी स्वतंत्र यंत्रणा 
चारही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी सोशल मीडियासाठी स्वतंत्र टिम केल्या आहेत. त्यात ४ ते ८ जण काम करतात. ग्रामीण भागात काही प्रतिनिधीही त्यांनी नियुक्त केले आहेत. या टिम फेसबुक पेज तयार करून फॉलोअर मिळवितात. तसेच व्हॉट्‌सअपचे ग्रुप करतात अन्‌ पोस्ट व्हायरल तयार करतात. त्यासाठी मोठा खर्च येत आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Social Media Publicity Politics