Loksabha 2019 : मावळ मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांसह 250 मतदान केंद्रांवरील परिस्थितीवर प्रशासनाकडून "वेब कास्टिंग'द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. म्हाळुंगे- बालेवाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन सुरक्षित ठेवण्यात येतील, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. 

पुणे -  मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांसह 250 मतदान केंद्रांवरील परिस्थितीवर प्रशासनाकडून "वेब कास्टिंग'द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. म्हाळुंगे- बालेवाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन सुरक्षित ठेवण्यात येतील, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. 

मतदारसंघात सुमारे 75 टक्‍के मतदारांना "व्होटर स्लिप'चे वाटप झाले आहे. उर्वरित स्लिपचे वाटप दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. निवडणुकीदरम्यान 63 हजार लिटर अवैध मद्यसाठा आणि 13 वाहने जप्त करण्यात आली आहेत. "सी-व्हिजील' ऍपद्वारे नागरिकांकडून 262 तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच, आचारसंहिता भंग केल्याबाबत सात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. 

मावळ लोकसभा मतदारसंघ 
मतदान केंद्र - 2504 
संवेदनशील मतदान केंद्र - 63 
निवडणूक कर्मचारी - 14 हजार 
ईव्हीएम मशिन - सुमारे 5500 
व्हीव्हीपॅट मशिन - सुमारे 2600 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval constituency is ready to complete the voting