Election Result : पार्थ पवार पहिल्या फेरीत 12 हजार मतांनी पिछाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे  : मावळ लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी पूर्ण झाली असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे 75037 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे पार्थ पवार 62868, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील 6404 मतांनी मागे आहेत. 

पुणे  : मावळ लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी पूर्ण झाली असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे 75037 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे पार्थ पवार 62868, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील 6404 मतांनी मागे आहेत. 

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अजमावणाऱ्या पालकमंत्री बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पार्थ अजित पवार यांच्यासह 93 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे जिल्ह्यातील चार जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. पुणे शहरात 10.34 लाख (49.84 टक्के), मावळमध्ये 13.66 लाख (59.49 टक्के) शिरूरमध्ये 12.92 लाख (59.46 टक्के), तर बारामतीमध्ये 12.99 लाख (61.54 टक्के) मतदान झाले. यंदा प्रथमच मतदानाच्या वेळी "व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यात आला. पुण्यात भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत होत आहे. 

मतदारसंघात असे आहेत उमेदवार 
पुणे : 31 
मावळ : 21 
बारामती : 18 
शिरूर : 23 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Partha Pawar is trailing 12,000 votes in the first round