Loksabha 2019 : राज ठाकरे यांना आमदार रमेश वांजळेंची आठवण

गुरुवार, 18 एप्रिल 2019

- राज ठाकरे यांना मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण
- माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते
- पुण्यातील सभेत राज भावूक

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पुण्यातील सभेत मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची आठवण झाली. खडकवासला भागातून येताना जाताना माझ्या रमेश वांजळेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझा वाघ गेला. आज ते असायला पाहिजे होते असे आज पुण्यातील सभेत सांगताना राज भावूक झालेले पहायला मिळाले.

पुढे राज ठाकरे मोदी शहांवर टीका करताना म्हणाले की, भाजपचे एवढे मोठे कार्यालय कसे थाटले? त्यासाठी पैसा कोठून आणला? याचे उत्तर मोदी शहांनी द्यायला हवे. देशासाठी पैसा आणायला हवा होता, मात्र मोदींच्या काळात ठराविक लोकांनी देशातून पैसा पळवून नेला, असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी-शहा पुन्हा निवडून आल्यास लोकांना गुलाम करतील. राजकीय क्षितिजावरून मोदी शहांना हटविण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

मोदी निवडणुकीचा प्रचार भलतीकडे घेऊन जात आहेत. पुलवामावर मतं मागत आहेत. माढ्यामध्ये नरेंद्र मोदींनी स्वत:ची जात काढून कहर केला. मागासवर्गीयांवर झालेल्या अत्याचारावर मोदींचे मौन का? असे अनेक प्रश्न राज यांनी आजच्या सभेत पंतप्रधान मोदींना केले. मृत जनावरांची कातडी काढणाऱ्यांना गोरक्षकांनी गुजरातमध्ये मारहाण केली असल्याचेही राज यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray became nostalgic about MLA Ramesh wanjale in Pune Rally