Election Results : ...म्हणून पार्थ पवार निवडणूक हरले !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 215913 मतांनी पराभव केला.

लोकसभा निकाल 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 215913 मतांनी पराभव केला. पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सर्व ताकद पार्थ यांच्या मागे लावली होती. खुद्द अजित पवार आणि राष्ट्रवादीचे बडे नेते पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये होते. तरीही पार्थ पवार यांचा पराभव झाला.

पार्थ पवार यांच्या पराभवाची महत्वाची काही कारणे पाहू...

1) प्रचारातू हवा तसा प्रभाव पाडता आला नाही

2) मतदार संघात केवळ शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा येवढीच ओळख

3)मतदारसंघात यापूर्वी संपर्क नाही

4) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना मिळालेल्या मतांचा फटका

5) श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन

6)पार्थ हे तरुण असुनही त्यांना तरुणांची मते मिळवण्यात अपयश

7)परिसरातील प्रश्न माहीत नाहीत

8)श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध मावळला

9)पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला पार्थ पवार यांच्या मागे ताकद उभी करता आली नाही.

अशी अनेक कारणे पार्थ पवार यांच्या पराभवाची देता येतील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reasons Behind Parth Pawar Defeat From Maval Loksabha Constituency