Shirur Loksabha 2019 : आढळराव पाटील यांच्यासमोर आव्हान अमोल कोल्हे यांचे!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

शिरुरमध्ये सायंकाळी सातपर्यंत 58.40 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरुरमधील हडपसर या विधानसभा मतदारसंघात सकाळपासून सर्वाधिक मतदान झाले आहे.​

शिरुर : निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरमधील विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची शिरुरमधील लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. शिरुरमध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली.

याआधी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण प्रवेश करणार्‍या कोल्हे यांनी निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी थेट लोकसभेचे तिकीटही मिळविले. विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे.

शिरुरमध्ये सायंकाळी सातपर्यंत 58.40 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
जुन्नर : 61.00
आंबेगाव : 67.00
खेड आळंदी : 59.00
शिरुर : 60.00
भोसरी : 54.00
हडपसर : 54.00


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tough fight between Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil in Shirur Constituency for Loksabha 2019