Loksabha 2019 : छगन भुजबळ यांना सापडेना मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

नाशकात अनेक मतदान केंद्रात यादीत नावच नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत आहे. अनेकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी चार-पाच तास फिरावे लागत आहे. याचा फटका छगन भुजबळ यांनाही बसला. 

लोकसभा 2019
नाशिक : नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. मात्र देशभर बऱ्याच मतदान केंद्रात झाला तसा नाशकातही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चक्क त्यांचे मतदान केंद्रच सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशकात अनेक मतदान केंद्रात यादीत नावच नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत आहे. अनेकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी चार-पाच तास फिरावे लागत आहे. याचा फटका छगन भुजबळ यांनाही बसला. 

भुजबळ यांचे मतदान केंद्र असलेल्या ग्रामोद्य विद्यालयात त्यांना आपल्या मतदान केंद्र असलेल्या 15 ते 20 मिनिटे फिरावे लागले. एवढेच नव्हे तर नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या आईचे नावही मतदान यादीत नसल्याचे सांगितले जात आहे. सरकारकडून जाणूनबूजुन असा त्रास मतदारांना दिला जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. 

नाशकात समीर भुजबळ यांच्या विरोधात महायुतीचे हेमंत गोडसे असा सामना आहे. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन देखील खराब होत आहेत, अनेक ठिकाणी चार-पाच किलोमीटर फिरुनही मतदारांना मतदान केंद्र सापडत नसल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal could not find the polling booth for voting for Loksabha 2019