Loksabha 2019 : भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवा : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

- भाजप नेत्यांकडून निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात
- निवडणुकीनंतर ती विसरली जातात.
- भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवा

 

नाशिक : भाजप नेत्यांकडून निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात, पण निवडणुकीनंतर ती विसरली जातात. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवा, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत भाजप नेते शेतकऱ्यांबद्दल काय काय बोलले याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचून दाखविला. बर्डेची वाडी या गावातील दुष्काळी परिस्थितीचा साम टिव्हीने घेतलेल्या स्थितीचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी दाखविला. 

राज ठाकरे म्हणाले, युतीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही मिळाला. भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवा. आ्म्ही नाशिकमध्ये केलेली कामे ही स्मार्ट नाशिक म्हणून केल्याचे दाखवत आहेत. नोटाबंदीच्या काळात नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले, मारा खावा लागला. नोटाबंदीच्या निर्णय का घेतला हे कोणालाच माहिती नाही.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आगोदर विरोध करणारे मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर जीएसटी आणली. कोट्यवधी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. राफेल विमानाचे कंत्राट एचएएलऐवजी मित्र असल्यामुळे अनिल अंबानीला देण्यात आले. जेट एअरवेजसारखी कंपनी बुडाली. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही. फक्त नोटाबंदी आणि जीएसटीमुळे हे सर्व झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray slams bjp leaders Nashik Rally